पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी शिरुर मतदारसंघात प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर येथे मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांसह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मागील ५ वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या सभांना अनेक ठिकाणी आलो आहे. परंतु पाच वर्षाच्या मध्येच डॉ अमोल कोल्हे मला म्हणायला लागले. दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदारच नाही. दादा मी सेलिब्रेटी असून मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी अभिनेता,मालिकेत काम करणारा कलावंत आहे.त्यामुळे माझ मोठ नुकसान होत आहे. यामुळे मला राजीनामा द्यायचा आहे. मी त्यांच सर्व म्हणण ऐकून घेतल्यावर एकच म्हटले की, बाबा रे तुला लोकांनी पाच वर्षाकरीता निवडून दिले आहे. जरा कळ काढ, जरा कळ काढ, ५ वर्ष पूर्ण होऊ दे,पुन्हा नको उभा राहू बाबा, मी पुन्हा उभा रहा देखील म्हणणार नाही. पण आता पुन्हा त्यांना काय झाले आहे की, पुन्हा जोर आणि बैठका सुरू केल्या आहेत आणि आखाड्यात आले आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.
“अमोल कोल्हेंनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता हवेली आणि शिरुर मतदार संघाला ठरवायच, तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार पाहिजे”, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत होणार ‘हे’ बदल
-सुनेत्रा पवारांची प्रचारसभा घेणार का? राज ठाकरे म्हणाले, ‘मी महायुतीच्या …’
-सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”