पुणे : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या महत्त्वकांक्षा वाढल्या आहेत. पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघावर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये देखील दावेदारी सुरू झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ८ पैकी किमान ३ मतदारसंघ मिळायला हवेत, अशी भूमिका शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी ‘पुणे लोकल’शी बोलताना केला आहे.
पुण्यातील ८ मतदारसंघापैकी किमान ३ जागा शिवसेनेला मिळाव्यात अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत. हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघात पूर्वीपासून शिवसेनेचे प्राबल्य आहे. महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य आहे. मात्र, तरीही या तिन्ही जागा शिवसेनेला मिळवण्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे नाना भानगिरे म्हणाले आहेत.
हडपसरमधून नाना भानगिरेंची जय्यत तयारी
हडपसर विधानसभा मतदारसंघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत. भाजपकडून माजी आमदार योगेश टिळेकर यांनी देखील तयारी चालवली आहे. तर स्वत: नाना भानगिरे हे हडपसरमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी भानगिरे यांनी मतदारसंघात आणला आहे. त्यामुळे हडपसर विधानसभा शिवसेनेकडे राखण्यासाठी भानगिरे आग्रही आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘असा विजय काय कामाचा जो…?.’; सुषमा अंधारेंचा रवींद्र वायकरांना सवाल
-संजय राऊतांनी राणेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांचा घोडा…’
-आता बारमध्ये बसून दारु पिण्यासाठीही लागणार ‘हे’ सरकारी दस्ताऐवज
-मुलींना मोफत शिक्षण यंदापासूनच! सरकारची संपूर्ण तयारी, नेमकी कधी होणार अंमलबजावणी? वाचा
-महाराष्ट्र्रात मान्सूनची वाटचाल मंदावली, ‘या’ राज्यात अलर्ट जारी!