पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काही दिवसांत निवडणुकींच्या तारखा जाहीर होतील. असे असतानाच पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा राजकीय राडा पहायला मिळत आहे. महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये मित्रपक्षांकडून दावा करण्यात येत आहे. पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असताना देखील शिवसेनेकडून हडपसरच्या जागेवर दावा करण्यात येत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यावरुन आता महायुतीमध्ये मोठा वाद होण्याची चिन्हे आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यातील ८ पैकी वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे.
नाना भानगिरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. हडपसर मतदारसंघामध्ये ‘हडपसर शिवसेनेचाच’ अशा आशयाचे भानगिरे यांचे बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. पुण्यात शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी शिवसेनेला पुण्यातील ३ पैकी २ तरी आमदार शहरामध्ये असावेत. म्हणून हडपसर शिवसेनेला मिळण्यासाठी शेवटपर्यंत वरिष्ठांकडे मागणी करणार आहोत, असे नाना भानगिरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…
-‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या, हा काय बिहार आहे का? शिवसेनेची वाघीण कडाडली
-पालिकेचा ट्रक पडलेल्या खड्ड्याचा ऐतिहासिक संदर्भ लागला; काय आहे नेमकं कारण?
-पिंपरी, चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत मिठाचा खडा; काय असणार राजकीय गणितं?