पुणे : एकीकडे पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले तर दुसरीकडे तरुणाई नशेत टल्ली झाल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे सगळं सुरु असतानाच आता एका शेतकऱ्याने अफूची लागवड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात अफुच्या शेतीचं प्रमाण वाढत असल्याचं मागील काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवायांवरुन समोर आलं आहे. त्यातच शिक्रापूर येथील महालक्ष्मीनगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी टाकलेल्या छापा टाकला. या छाप्यात अफूची तब्बल १ हजार २२६ झाडे जप्त केली. तसेच अफूची लागवड करणाऱ्या एका पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सुशील शिवाजीराव ढमढेरे (वय ३८) आणि सत्यभामा सुरेश थोरात (वय ५५, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
महाराष्ट्रात अफुची शेती करणं बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अफू आणि गांजाची शेती करताना दिसत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफुची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीत पोस्टर झळकले ‘सुनेत्रा पवार फिक्स खासदार’; अजित पवार गटाचा उमेदवार ठरला???
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठी कारवाई; फडणवीसांनी दिले २५ लाखांचे रोख बक्षीस
-मोहोळ, मुळीक की देवधर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर
-पुण्यात कोट्यावधींचे ड्रग्ज: तरुणाई नशेत टुल्ल; पिट्याभाईंच्या त्या व्हिडीओने राज्य हादरलं
-‘यंदाच्या निवडणुकीत ४० हजार मतांनी निवडणून येणार’; शहाजी बापू पाटलांचा विश्वास