पुणे : पुणे महानगरपालिका मेट्रोच्या रुळावर ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आक्रमक कार्यकर्त्यांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. पक्षाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी आंदोलना दरम्यान पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. सुदैवाने पुढील अनुचित घटना थोडक्यात टळली. यावर पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली. याप्रकरणी १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (sp) कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास पालिकेच्या मेट्रो स्टेशनमध्ये गेले. यावेळी त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या. या कार्यकर्त्यांसोबत काही महिला कार्यकर्त्यांही होत्या. थेट मेट्रो मार्गिकेवर (ट्रॅक) धाव घेत आंदोलन सुरु केले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त गिल्ल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
उपायुक्त गिल्ल आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना हात जोडून बराच वेळ विनंत्या केल्या. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक पावटेकर आणि एक तरुण मार्गिर्किवरील कढड्यावर चढले. तेथून ते कधीही तोल जाऊन खाली पडले असते. म्हणून गिल्ल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ केली. यामुळे त्यांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन लावून दिला. आक्रमक पावटेकर यांनी जगताप यांनाच शिवीगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाही असते म्हणत बोलण्यास नकार दिला.
आंदोलकांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी पुन्हा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पावटेकर यांनी उपायुक्त गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले. त्यानंतर मात्र गिल्ल यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना पकडून त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने ओढत मेट्रो स्थानकात आणले. उद्दामपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. गाडीत घालून सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. आंदोलकांच्या झटापटीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. तसेच सुदैवाने उन्हामुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमुळे पोलिसांच्या अंगावरील पेट्रोलने पेट घेतला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात शरद पवार गट आक्रमक; शहराध्यक्षांकडून आंदोलक कार्यकर्त्यांचं निलंबन, नेमका काय प्रकार?
-उषा काकडेंचा आत्महत्येचा प्रयत्न की फूड पॅायझनिंग? रुग्नालयाने दिली महत्वाची माहिती
-Pune: गौरव आहुजाने माफी मागितलेले शिंदे साहेब नेमके कोण?
-संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?