पुणे : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये आज ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांसह इतर नेते मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी सरकारचे आभार मानले आहेत.
“देशाच्या तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता सरकारनेदेखील या तरुणांना रोजगार मिळवून देण्यात लक्ष दिल्यानं त्याचे आभार मानतो. आजच्या तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज आहे, त्यासाठी राजकारण सोडून सगळ्यांनी एकत्र यावं”, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले आहेत.
“विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणाच बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकार तरुणांना नोकऱ्या देण्याचं ठरवलं आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो”, असं म्हणत शरद पवारांनी सरकारचे आभार मानले आहेत.
“आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे. आता विद्या प्रतिष्ठानमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरु होत आहे. राजकारण आपल्या जागी होत असते. पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू”, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिरुर लोकसभेत आयात केलेल्यांना उमेदवारी देणार असाल तर….; विलास लांडेंचा अजितदादांना इशारा
-Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण
-ड्रग्ज प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा हात??? चौकशी सुरु
-पिंपरी चिंचवड पोलिसांकडून २ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त
-पुण्यात पाणी कपात; बुधवारी शहरातील ‘या’ परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद