पुणे : महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला १० पैकी ८ जागा मिळाल्या. त्यानंतर खासदार शरद पवार गटाने आगामी विधानसभेची जय्यत तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शुक्रवारी नवनिर्वाचित खासदार आणि प्रमुख आमदारांसह तब्बल ४ तास बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये महत्वाचा घटक असताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त काही न ताणता केवळ १० जागा घेतल्या आणि झंझावाती प्रचार करत १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. सातारा लोकसभेतील जागा कमी मताने पराभूत झाली आहे. मात्र इतर पक्षांच्या तुलनेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा जास्त जागांचा आग्रह महाविकास आघाडीमध्ये राहणार आहे.
शरद पवारांनी पुण्यातील त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी काही खासदार आणि काही नेत्यांची अनौपचारिक चर्चा केली. या वेळी त्यांनी आपण महाविकास आघाडी टिकवण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये कमी म्हणजे १० जागा लढायच्या जागा घेतल्या. आपले लक्ष्य लोकसभा नाही, तर विधानसभा होते, त्यामुळे आपणास विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढायच्या आहेत, असे सूचित केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-देशात पेपरफुटीविरोधी कायदा लागू; कारवाईची तरतूद काय असणार? वाचा सविस्तर…
-‘अजितदादांना एकटं पाडलं जातंय त्यांनी महायुती सोडावी अन्…’; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचं वक्तव्य
-ससूनचे नवे अधिष्ठता डॉ. एकनाथ पवारांची डॉक्टरांना तंबी; म्हणाले, ‘रुग्णांना बाहेरुन…’
-‘हे सरकार जातीयवादी, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु केला’; नाना पटोलेंची सरकावर आगपाखड
-पोलीस भरती मैदानी चाचणीबाबत फडणवीस म्हणाले, ‘पावसामुळे तर मैदानी चाचण्या पुढे पण…’