पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात देखील केली आहे. अनेक पक्षांमध्ये जागाववाटप अद्याप ठरलेलं निश्चित नसल्याने काही नेते नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे. महायुतीत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत घेऊन माढा लोकसभेची जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
महादेव जानकर यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी महादेव जानकर यांच्याशी तह करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बारामतीसह माढा लोकसभेचीही लढत लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतली. जानकर आणि शरद पवार यांच्याच महत्वाची चर्चा झाली. आणि या चर्चेत महादेव जानकरांसाठी माढाची जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे जानकरांना आता माढा लोकसभा मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. येत्या दोन दिवसात याबाबत अधिकृत निर्णय होणार असल्याचं बोललं जात आहे.
महादेव जानकर यांना शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर आता ठाकरे गट आणि कॉंग्रेसला कोणती जागा सोडणार ? याचीही चर्चा आहे. महादेव जानकरांसाठी शरद पवार हे माढाच्या जागेसाठी आग्रही आहेत. असे असतानाच शरद पवार गटाकडूनच अभयसिंह जगताप यांनी शरद पवारांती भेट घेऊन ते स्वत: सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे म्हणाले आहेत.
‘वंचित बहुजन आघाडीसोबत घेण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्यांची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली ताकद आहे. तसेच रासपचे महादेव जानकर हे सोबत आले तर त्यांचेदेखील स्वागत आहे. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघ देण्याची माझी तयारी आहे’, असे स्पष्ट मत शरद पवारांनी या वेळी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’
-‘येत्या काळात ठाकरे-मोदी एकत्र येणार’; शहाजी बापू पाटलांनी वर्तवलं भाकित
-पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम; वाहतूक नियमात बदल करुनही ट्रफिकच
-‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी