पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीमध्ये सामील होताना पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह सोबत नेले. न्यायालयाने अधिकृत हक्क अजित पवारांकडे दिला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने नव्या निवडणूक चिन्हावर लोकसभा निवडणूक लढली.
शरद पवार गटाने लोकसभा निवडणूक अधिकृत निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ चिन्हावर लढली आहे तर निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून ‘पिपाणी’ चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्हाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसल्याचे सांगत खासदार शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्हामुळे आम्हाला मोठा फटका बसला असून याबाबत लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, असे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रामध्ये म्हंटले आहे. ‘साताऱ्याची जागा राष्ट्रवादीचाच विजय मिळाला असता पण केवळ ‘पिपाणी’ चिन्हामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे. राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही सर्वोच्य न्यायालयात धाव घेऊ’, असा इशारा शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज
-पुणे ड्रग्ज पार्टी: सामाजिक संघटनांचा आक्रमक पवित्रा; एल थ्री बारवर पतीत पावन संघटनेकडून दगडफेक
-‘मी पालकमंत्री होतो तेव्हा…’; चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता अजित पवारांवर साधला निशाणा
-पुणे ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत; या प्रकरणात महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश
-Pune Drugs Party: ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित