पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीची राज्यभर धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवानंतर सर्व राजकीय पक्ष आणखी जोमाने तयारीला लागले आहेत. आपल्या पक्षाच्या जास्तीत जागा निवडून येण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. अनंत चुतर्दशीच्या दिवशी भाजपचे वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हाती घेतली. त्यातच आता पुण्यात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या आता तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आल्याच्या जोरदार चर्चा आहेत. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पत्नी अश्विनी जगताप आणि लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यात वाद सुरू होता. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याच्या चर्चा आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शरद पवार राज्यातील महत्वाच्या विधानसभा मतदारसंघावर डाव टाकत आहेत. पुण्यातील सर्वात महत्वाचा असणाऱ्या वडगावशेरी मतदारसंघात खेळी करत बापूसाहेब पठारे यांना पुन्हा पक्षात घेतले आणि भाजपला मोठा धक्का दिला. त्यानंतर आता विद्यमान आमदार अश्विनी जगताप या देखील हाती ‘तुतारी’ घेणार का? आणि त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, अश्विनी जगताप यांच्या शरद पवार गटात प्रवेश केला तर भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पठारेंच्या हाती तुतारी मात्र उमेदवारीची वाट खडतर, वडगाव शेरीवर ठाकरेसेनेचा दावा कायम
-जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली
-‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर
-बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना