मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी भेट घेतली आहे.
एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आज दुपारी २ वाजता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आधीच होती. त्यानंतर या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती होती.
गेल्या १५ दिवसांमध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही दुसरी भेट आहे. २२ जुलै रोजी देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. गेल्या भेटीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह इतर प्रश्नांवर चर्चा झाली होती. आताच्या भेटीत विरोधकांच्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सरकारकडून डावलण्यात आल्याचा मुद्दा, पाणी प्रश्न, निधी यांसारख्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, त्यांना…’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिली ढेकणाची उपमा
-मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…