पुणे : मावळ लोकसभेचे पहिले खासदार दिवंगत गजानन बाबर यांच्या जीवन चरित्रावर ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी चिंचवड येथे झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, ठाकरे गटाचे मावळचे संघटक संजोग वाघेरे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी सुप्रिया सुळे राज्यसभेवर पहिल्यांदा कशा निवडून गेल्या हे सांगितले आहे.
“विधायक कामाला प्रोत्साहन देणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन नेते होऊन गेले. त्यांनी सामान्य कुटुंबातील माणसाला उभे केले. बाळासाहेब ठाकरे आणि आमची मैत्री होती. ठाकरे यांच्यामुळे सुप्रिया सुळे या पहिल्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या”, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
“आमच्या पक्षाने सुप्रियाला राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे समजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करुन आपली मुलगी पहिल्यांदा संसदेत जात आहे. त्यामुळे आमचा उमेदवार नसेल असे सांगून सुप्रियाला बिनविरोध राज्यसभेत पाठविले. एवढा मोठा अंत:करणाचा मोठेपणा क्वचित बघायला मिळतो. तो ठाकरे यांच्यामध्ये होता”, असे म्हणत सुप्रिया सुळेंची राज्यसभेवर पहिल्यांदा बिनविरोध निवड झाल्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पाणीकपात टळली मात्र, या भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद
-पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चढाओढ
-‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी
-काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल