पुणे : कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यांवर सक्तवसुली संचालनायलाने म्हणजेच ईडीने कारवाई केली. रोहित पवार यांनी ईडीकडून आपल्याला अटक होईल, अशी शक्यताही केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत रोहित पवारांची पाठराखण तर ईडीच्या कारवाईची पोलखोल केली आहे.
“भाजप सत्तेत आल्यापासून आठ वर्षात १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षांच्या सरकारांमधील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार यांच्यासह ७ माजी खासदार, ११ माजी आमदारांचा समावेश आहे” अशी आकडेवारी सांगत शरद पवारांनी भाजपची पोलखोल केली आहे.
“काँग्रेसप्रणीत यूपीएच्या काळातील १० वर्षात २६ नेत्यांवर कारवाई झाली. त्यामध्ये पाच काँग्रेस नेत्यांचा समावेश असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या केवळ तीन नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून भाजप राजकीय सुडापोटी कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले असून कोणत्या नेत्यावर कारवाई करायची, याचे आदेश भाजप कार्यालयातून जात आहेत”, असा गंभीर आरोपही यावेळी शरद पवारांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचं वक्तव्य; ‘जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालीय तिन्ही पक्ष…’
-दिल्ली दरबारी महायुतीची महत्वाची बैठक; लोकसभेसाठी महायुतीकडून पुण्यात ‘या’ नावाला पसंती
-पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता
-भुयारी मार्गच्या उद्घाटनाचा स्थानकांनीच घेतला पुढाकार; निगडीत नागरिकांनीच केलं लोकापर्ण
-अजितदादांना धक्का अन् काकांना साथ, निलेश लंकेंच पक्क ठरलंय? पुण्यात नेमकं काय घडलं?