Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपूर्वी आणि फुटीनंतर देखील खासदार शरद पवार यांच्या राजकारणातून रिटायर होण्याबाबत अनेक स्तरावरती चर्चा आणि टीका झाल्या आहेत. त्यामुळे शरद पवार रिटायर कधी होणार? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच खुद्द शरद पवारांनीच रिटायर कधी व्हावं याबाबत आपली भूमिका मांडली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत T-20 वर्ल्ड कपवरती आपले नाव कोरला आहे. या टीम इंडियाच्या कामगिरीवर बोलताना शरद पवारांनी तोंडभरुन कौतुक केले आहे.
‘एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका त्यांचे वेगळे स्थान होते. मात्र अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिंकण्यासाठी भारताला दरम्यानच्या काळामध्ये मोठी प्रतीक्षा करावी लागली मात्र आता भारतीय टीमने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला आहे’, असे शरद पवार म्हणाले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वर्ल्डकप फायनलनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबत शरद पवार म्हणाले, हे दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. त्यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र ते वनडे आणि टेस्ट मॅच खेळताना पाहायला मिळतील.
‘वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. मात्र गोलंदाजी करताना जसप्रीत बुमरा सिंग आणि यादव चांगली कामगिरी केली. त्यामुळे T-20 च्या विजेत्या दुष्काळातून भारताचे मुक्तता झाली. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा हा शेवटचा सामना होता. द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो’, असे शरद पवार म्हणाले आहेत.
‘ही गोष्ट चांगली आहे की एक ठराविक कालावधीनंतर तुमचा फॉर्म टॉपवरती असतो त्याचवेळी निवृत्त होण्यासाठी योग्य वेळ असते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे दोघांचेही जागतिक क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली. आता नव्याने तरुणांना संधी मिळावी. यासाठी त्यांनी टी-ट्वेंटीमधून निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला हा योग्य आहे. अशाच प्रकारे भारताने मुंबईमध्ये वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सचिन तेंडुलकर यांनी देखील निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देखील ते नवीन तरुणांना प्रोत्साहित करत राहिले. त्यामुळे T-20 क्रिकेट मध्ये नवीन तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विराट आणि रोहित यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, असे शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप
-पुण्यनगरीत आज ज्ञानेबा-तुकोबांच्या पालख्यांचे होणार मनोमिलन; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल
-‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका
-पावसाळ्यात आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काय खावे काय टाळावे?