पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभेत अजित पवारांना मिळालेलं अपयश आणि शरद पवारांना मिळालेल्या यशामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या चर्चांना अजित पवार गटाकडून वारंवार पुर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला मात्र आता शरद पवार यांनीही याबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण ते जयंतरावांना भेटतात’ असा गौप्यस्फोटच शरद पवारांनी केला आहे. शरद पवार सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
”माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. पण, जयंत पाटील यांना ते लोक भेटतात याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचे मतदान झाल्यावर कळेल,” असे शरद पवार यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच मोरे म्हणाले, ‘मी पक्षात प्रवेश केला नाही तर…’
-वसंत मोरे आज हाती शिवबंधन बांधणार; गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेऊन मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन
-मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत