बारामती : सर्वाधिक चर्चेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती लोकसभेत पराभव केल्यानंतर आता शरद पवारांनी विधानसभेतही अजित पवारांना पराभवाची धूळ चारण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बारामतीमध्ये शरद पवार हे आजपासून ३ दिवस मतदारसंघामध्ये आहेत. तसेच संपूर्ण बारामती तालुका शरद पवार पिंजून काढणार असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील निंबुत या गावापासून शरद पवार आपल्या ३ दिवसीय दौऱ्याला सुरवात करणार आहेत. शरद पवारांसोबत या दौऱ्यामध्ये अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारही असणार आहेत. मागच्या आठवड्यात शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शरद पवार अजितदादांना शह देण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी ३५ वर्षे शरद पवारांनी बारामतीची सुत्रे अजित पवारांच्या हाती दिली होती. त्यामुळे शरद पवारांनी बारामतीकडे विशेष लक्ष दिले नव्हते. मात्र, पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता बारामतीचा प्रत्येक भाग शरद पवार पिंजून काढत आहेत. त्यातच आगामी विधानसभेमध्ये अजित पवारांना शह देण्याचा चंग शरद पवारांनी बांंधला असून अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या साथीला आहेत. त्यामुळे यंदाची काका (अजित) आणि पुतण्याची (युगेंद्र) लढाई रंगताना दिसू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-रुपाली ठोंबरे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा; घेतली अजित पवारांची भेट, म्हणाल्या, ‘दादा…’
-रोहित पवारांच्या ट्विटची महाराष्ट्र पोलीस विभागाने घेतली दखल; पोलीस भरतीबाबत ‘हा’ मोठा निर्णय
-मिलियन्समध्ये फॉलोवर्स असणारी X-mau मयुरी पवार गायब; पोलिसांकडून शोध सुरू
-लोकसभा पराभवानंतर RSS इन ॲक्शन मोड; ‘मोतीबागेत’ नेत्यांची परेड; नेमकं घडतंय काय?