पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या असून चांगलेच यश मिळाले आहे. त्यानंतर आता सर्व पक्ष आगामी निवडणुकीची तयारी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामीर होतील, अशी चर्चा रंगली होती. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सूचक वक्तव्य करत शरद केलं होते. त्यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाकडूनही सणसणीत उत्तर देण्यात आले आहे.
“इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या योगदानांवरुन निर्णय घेतील”
“सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य आहे? याबाबत मला सांगता येणार नाही. मात्र, आमच्या पक्षातील जे इतर माझे सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र, याबाबत स्पष्ट असं विधान करता येणार नाही. त्यामध्ये जे इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांचं योगदान आणि भूमिका यावरून निर्णय घेतला जाईल”, असे शरद पवार म्हणाले होते.
“म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत”
शरद पवार ज्याअर्थी हे म्हणत आहेत की त्यांच्याकडे आमच्या गटातून लोक येऊ शकतात याचाच अर्थ त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत उमेदवार नाहीत. याआधी रोहित पवार यांनी अजित पवार गटातले १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यावेळीही अजित पवार गटाने हा दावा फेटाळून लावला होता. तसाच तो आजही उमेश पाटील यांनी फेटाळून लावला. आमच्या पक्षातला एकही आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेला पाठिंबा विधानसभेला ‘एकला चलो रे!’ पुण्यात मनसेची स्वबळाची चाचपणी; सर्व्हेही सुरू
-शिंदे-फडणवीस सरकारचं शेवटचं अधिवेशन फडणवीसांना पडणार भारी; पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गट घेरणार
-पुण्यातील फक्त २३ पब अन् बारला परवानगी; त्यातील १ रद्दही झालाय, वाचा नेमका काय प्रकार
-धक्कादायक! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; डॉक्टरला अन् मुलीला झिकाची लागण