पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये ‘नमो रोजगार मेळावा’ आयोजित केला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाचे खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण मिळाले नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
बारामतीत येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विनंतीवरून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहावं लागेल. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे.
बारामतीमध्ये शरद पवारांचे घर असल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार असल्याने हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. बारामतीला जेव्हा कुणीही येतं त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अथिती देवो भवः ही आमची संस्कृती आहे. राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शरद पवार यांनी जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्यामध्ये या कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळीच ११ ते १ ही वेळ राखीव ठेवली आहे. हे सगळे नेते एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावेळी शरद पवार नेमके काय बोलणार? याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत.
बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असतानाही, राज्यसभेचे खासदार असणाऱ्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. आता शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिलं असताना ते आमंत्रण स्वीकारलं जाईल का हे पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाने घेतली दखल; पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ आदेश
-..म्हणून देवेंद्र फडणवीस परत एकदा म्हणाले, “मी पुन्हा येईन”
-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”
-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या