पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अतुल बेनके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना अतुल बेनकेंचे वडिल मित्र असल्याचे सांगितले अन् तासाभरातच शरद पवारांनी आपले वक्तव्य बदलले आहे.
भेटीनंतर काय म्हणाले शरद पवार?
अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते, अशी आठवण सांगितली. तसेच लोकसभा निवडणुकीत आमचे काम ज्यांनी केले, त्यांना विसरणार नाही. “यात नवीन काय? लोक भेटायला येत असतात. अतुलचे वडील माझे मित्र आहे. माझ्या मित्राचा तो मुलगा आहे. राजकारणाचा निर्णय त्या त्या वेळेस घेऊ”, असे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर काही तासांतच दुसरी पत्रकार परिषद झाली. दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी आपल्या वक्तव्य बदलल्याचे दिसून आले आहे.
नेमकं काय झालं?
शरद पवार आणि अतुल बेनके यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनाा पत्रकारांशी संवाद साधताना ‘विधानसभा निडणुकीपूर्वी काहीही होऊ शकतं. कदाचित अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात’, असे भाकीत वर्तवले होते. अतुल बेनके यांनी केलेल्या दाव्यावरु शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.
बेनकेंच्या दाव्यानंतर शरद पवार काय म्हणाले?
“कोण अतुल बेनके? हे कोण आहेत? पक्षाच्या अध्यक्षाने उत्तर द्यावे, एवढा महत्त्वाचा माणूस आहे का? पत्रकारांनी कुणाबद्दल प्रश्न विचारावा, याचे काही तारतम्य ठेवावे. राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधाने करतात. त्यांची नोंद घ्यायची नसते”, असे शरद पवार म्हणाले आहेत. अतुल बेनके यांच्या दाव्यावरुन शरद पवारांनी तासाभरातच बदलल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली, वेटींग लिस्ट लागली; वाचा कधीपासून प्रवेश सुरु?
-वसंत मोरेंना ‘तो’ फोन कोणी केला? मोरेंच्या आरोपावरुन पुण्याच्या राजकारणात खळबळ
-‘गुलाबी मंच अन् गुलाबी कोट’, अजित पवारांच्या ‘त्या’ गुलाबी कोटचं रहस्य काय?
-होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली
-अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”