पुणे : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान १३ मे रोजी होणार आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये पुणे शहराच्या विकासाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शरद पवारांना धारेवर धरल्याचं पहायला मिळालं आहे.
“शरद पवारांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि राज्यात जातीयतेचे राजकारण सुरु झाले. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरुन राजकारण झाले. भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरुन राजकारण झाले. पण राष्ट्रवादीमधील अजित पवार या माणसाने कधीही जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी जातीचे राजकारण केले नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“राज्यात आजही काही नेते जनतेला जातीपातीचं राजकाणात गुंतवून ठेवत आहेत. पण याबाबतीत अजित पवारांना मानलं पाहिजे. अजित पवारांशी माझे अनेक मतभेद असतील पण या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांचे कौतुक केले आहे.
पुण्यात राम गडकरींचा पुतळा हटवण्यात आला. अनेकांना तेव्हा वाटलं होतं नितीन गडकरींचे ते नातेवाईक आहेत, म्हणून पुतळा हटवला. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापन केल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं विष कालवलं गेलं, असा गंभीर आरोप यावेळी राज ठाकरेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही- देवेंद्र फडणवीस
-“पाच वर्षांपूर्वी पण अभिनय सोडतो म्हंटले पण…”; अमोल कोल्हेंच्या चुनावी जुमल्यावर आढळराव बरसले
-‘शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने शाश्वत उर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर’- मुरलीधर मोहोळ
-भर पावसात अजित पवारांचा रोड शो; म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय, त्यामुळे…”
-“भविष्यात लढेल की नाही माहीत नाही….” आढळराव पाटील झाले भावूक