पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काही वक्तव्यं नेहमीच चर्चेत असतात. आज शहाजी बापू पाटील हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत शहाजी पाटलांनी वक्तव्य केलं आहे.
‘माझ्यावर मतदारसंघात कोणीही नाराज नाही. माझ्या प्रत्येक निवडणुकीत मला मतदान करणार्या मतदाराची संख्या वाढत गेली आहे. हे आजवरच्या निवडणुकीत दिसून आले आहे. मी आजवर पाच वेळा हरलो आणि दोन वेळेस निवडून आलो आहे. आगामी निवडणुकीत मी किमान ४० हजार मतांनी निवडून येईल. मला त्याबद्दल अहंकार नाही. पण मी मतदारसंघात कामे केली आहेत. त्या जोरावर मी निश्चित निवडून येईल. गणपतराव देशमुख यांना चकवा देऊन २ निवडणुकीत निवडून आलोच ना’, असं भूमिका शहाजी बापू पाटील सांगत आपल्या मतदारसंघात निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
‘माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा असणार आहे. तसेच मोहिते पाटील यांच्याकडून कोणताही उमेदवार असला तरी माझा पाठिंबा हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच असणार आहे. त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत’, असे शहाजी पाटलांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास
-घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..
-दिलासादायक! भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणी कपात टळली; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय