पुणे : भोर मतदारसंघातील राजगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. या सभेत बोलताना साखर कारखान्याच्या मदतीमध्ये राज्य सरकारकडून झालेल्या दुजाभावाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी मनातील सल बोलून दाखवली. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड साखर कारखान्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य सरकारच्या हमीवर ८१ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ती मदत रद्द करण्यात आली. राजगड काखान्याला अडचणीत आणण्याचे काम ज्या मंडळींनी केले, त्यांचा बंदोबस्त करणे आता गरजेचे आहे, असं म्हणत संग्राम थोपटे यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘राजगडला मंजूर झालेले अर्थसाहाय्य रद्द करण्यात आल्यानंतर आम्ही साखर आयुक्त, मंत्री समिती, मुख्यमंत्री यांना भेटलो; परंतु समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. न्यायासाठी आम्ही शेवटी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. त्रुटी पूर्ण करून न्यायालयाने पुन्हा अर्ज करण्यात सांगितले आहे, त्यानुसार आम्ही प्रयत्न करत आहोत. राजकीय सत्तांतर होते, सत्ता येते जाते, परंतु आजपर्यंत इतिहासात अशा पद्धतीचे काम पाहिले नव्हते’, अशी टीका संग्राम थोपटे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘लाडकी बहिण, लाडकी लेक योजना राबवता, पण…’; शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड
-पुणे महापालिकेच्या निधी वाटपातही ‘लाडकी पदाधिकारी योजना?’ महायुतीत खडाखडी
-पुण्यात शरद पवारांचं टार्गेट सेट; दादा समर्थक आमदाराची काढली विकेट; म्हणाले, तू कोणाच्या पक्षातून…
-ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला
-पावसाने घातला खोडा आता नव्याने ठरला मुहूर्त, नेमकं कधी होणार मेट्रोचे उद्घाटन; मोहोळ म्हणाले…