Share Market : अमेरिकेनं मध्यवर्ती बँक फेडरल रिजर्व्हने 2025 मध्ये व्याज दरातील कपातीच्या संख्येत घट केल्यामुळे अमेरिकन स्टॉक एक्सचेंज देखील घसरला. त्याचा परिणाम भारतात देखील पाहायला मिळाला. भारतीय शेअर बाजार आज घसरणीसह खुला झाला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 300 अंकांनी घसरला. भारतीय शेअर बाजारातील या घसणरणीचा गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला आहे. सकाळच्या सत्रामध्ये गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपये बुडाले असून बीएसईचे मार्केट कॅप 452.6 लाख कोटींवरुन 449.34 लाख कोटीवर आले आहे. गेल्या 3 दिवसांपासून होणाऱ्या घसरणीमुळे भारतीय गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरुन 80 हजारांच्या खाली घसरला. सेन्सेक्स 79237 अंकांवर पोहोचला आहे. दुसरीकडे निफ्टी 90 अंकांनी घसरुन 23907 अंकांवर पोहोचला आहे. सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे शेअर घसरले. 2 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती. निफ्टीवर 50 कंपन्यांपैकी 47 कंपन्यांचे शेअर घसरले केवळ 3 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
इन्फोसिस 2.49 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 2.14 टक्के, एचसीएल टेक 1.93 टक्के, टेक महिंद्रा 1.85 टक्के, बजाज फिनसर्व 1.67 टक्के, टाटा स्टील 2.01टक्के घसरण झाली. केवळ एचयूएल आणि आईटीसीच्या शेअरमधये तेजी पाहायला मिळाली. बीएसईवरील 3306 शेअर 841 शेअरमध्ये तेजी तर 2354 शेअरमध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार
-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी पुणे मेट्रोची गुडन्यूज; आता मेट्रो धावणार…
-स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या अंतरात होणार बदल; किती अंतरावर असणार स्थानके?
-धक्कादायक! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा: ११ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार