पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शनिवारी आणि रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता पुणे मुंबई एक्स्प्रेस-वे दोन दिवस काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही या एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर आधी ही महत्वाची बातमी वाचा. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ अंतर्गत पुणे वाहिनीवर किलोमीटर क्र. २७ आणि कि.मी. क्र. ५५ येथे १८ आणि १९ मे या दोन दिवशी कमानीची (गॅन्ट्री) तांत्रिक तपासणी, दुरुस्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.
या रस्त्यावर ग्रॅंटी बसवण्याचं काम करणार असल्याने या रस्त्यावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत.
११९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करुन द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर स्थानकावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे, या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण असल्यास प्रवाशांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे रस्ते महामंडळाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कतरिना कैफ होणार आई..?; कतरिनाच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा
-शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं ओरबाडला; केळी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान
-उद्धव ठाकरेंना धक्का: पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
-दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल
-उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी