पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी प्रेमप्रकरणातून पती सतीश यांची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी या प्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ (वय ४५) यांना अटक केली आहे.
मोहिनी वाघ हिनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मोहिनीचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अखेर बुधवारी सायंकाळी मोहिनी वाघला अटक केली आहे. ९ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचे पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर त्यांचा मृतदेह त्याच दिवशी संध्याकाळी शिंदवणे घाटात आढळला. पुणे पोलिसांना आतापर्यंत या प्रकरणी एकूण ५ जणांना अटक केली आहे.
वाघ यांच्या घराजवळच राहणाऱ्या एका आरोपीचाही समावेश आहे. सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्नही झाले होते. याप्रकरणी ५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोहिनी सतीश वाघ यांच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर ती देखील या गटात सहभागी असलेल्या समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
सतीश वाघ यांची हडपसर परिसरातील मांजरी भागात शेती आहे. याशिवाय हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सतीश वाघ यांचे कोणाशीही वैर नसूनही त्यांचे असे अपहरण आणि नंतर हत्या झाली. त्यानंतर त्यांच्या हत्येमागे पत्नीचा हात असल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याचे देखील तितकेच धक्कादायक आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाडक्या बहिणींना नववर्षाआधीच राज्य सरकारकडून गिफ्ट; सहावा हफ्ता आजपासून होणार जमा
-शिवाजीनगर बस स्टॅन्डचा होणार कायापालट; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
-पुण्याच्या विकासात भर; अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक
-वाघोलीत भरधाव डंपरने घेतला तिघांचा बळी; मद्यधुंद चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
-पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘यॉर्कर टाका, गुगली टाका, मी पण बॅट्समन’