पुणे : माजी खासदार शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे नेते माजी खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीकडून अद्यापही उदनयराजे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यातच पत्रकारांनी उदयनराजे भोसले उमेदवारी जाहीर केली नाही.
उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास तुम्ही त्यांच्याशी बोलणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची हुबेहुब नक्कल करत कॉलर उडवून दाखवली आहे. त्याचबरोबर आता उदयनराजेंशी बोलण्याची शक्यता नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट सांगितले आहे. मग तुम्हीही कॉलर उडविणार का? या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी शरद पवारांनी भर पत्रकार परिषदेतच आपली कॉलर उडवून दाखविली आहे. त्यामुळे पत्रकरांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे.
दरम्यान, “उदयनराजे आता भाजपमध्ये आहेत. मी पाहिले दोन दिवसांपूर्वी सातारा शहराने त्यांचे संपूर्ण रस्त्यात स्वागत केले. त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा विषयच येत नाही”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे तिथे काय उणे! ‘पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन देणाऱ्यालाच मत’; पुण्यात झळकले बॅनर
-“ही बैठक सकारात्मक, येत्या ३ दिवसांत निर्णय होईल”; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मोरेंची प्रतिक्रया
-लोकसभा उमेदवारीवरून मोरे ‘वंचित‘ आता घेणार प्रकाश आंबेडरांची भेट
-श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण; पण ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?