पुणे : पुणे शहरातील सरकारी ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु असलेला १ आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याचे समोर आले आहे. संतोष सचिन साठे असे या पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी कलम ३५४ मधील गंभीर गुन्ह्यातील असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना पोलिसांचा देखरेखीखाली असलेला आरोपी साठेने सकाळी ससून रुग्णालयातून पळ काढला. याप्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
दरम्यान, ससून रुग्णालातून याआधी देखील काही आरोपी पळून गेल्याचे समोर आले आहे. देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स प्रकरणातील ड्रग्ज माफिया ललित पाटील २०२३ मध्ये पुण्यातील ससूनमधून पळून गेला होता. त्यावरुन पुणे पोलीसांवर अनेक गंभीर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते, या प्रकरणी कारवाई देखील झाली होती. मात्र, तरीदेखील रुग्णालयातून आरोपी पळून जाण्याचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कायदा आणि सुवस्थेची कसलीच भीती राहिली नसल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-छत्रपती शिवरायांकडे खरंच वाघ्या नावाचा कुत्रा होता का? संभाजीराजेंनी दाखवले ‘ते’ फोटो
-विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा
-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…