पुणे : पुण्यात कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली आहे. हा मुद्दा उचलून धरत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांसह पुणे पोलीस प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी रवींद्र धंगेकर यांना चांगलेच फटकारले आहे.
‘काँग्रेस आमदार धंगेकर यांनी कल्याणीनगर अपघातात राजकीय स्टंटबाजी करणे थांबवावे. अपघातातील मृत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत’, असा सल्ला देत संजय शिरसाट यांनी धंगेकरांना फटकारले आहे. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातानंतर आमदार धंगेकरांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.
या अपघातमध्ये पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या अलिशान कारच्या भरधाव वेगाने दोघांना चिरडले. या अपघातामध्ये अश्विनी आणि अनिस यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात आरोपीला स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली, तपासावेळी पोलिसांनी पैसे खाल्ल्याचा देखील गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण जास्त चिघळल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अपघाताची गंभीर दखल घेऊ अशा पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक घेत कारवाईच्या सूचना दिल्या. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणावरुन राजकारण करु नये असे सांगितले होते. त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी देखील धंगेकरांना फटकारले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’
-Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय
-पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’
-अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर
-पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती..’