पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिस सुंडके यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने महायुतीचे वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि त्यांचे नेते एक दिलाने मोहोळ यांच्यासाठी काम करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची उणीव दिसून येत होती. काकडे उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होते, मात्र मोहोळ यांच्या पारड्यात भाजपकडून उमेदवारीचे माप टाकण्यात आले. आता काहीसे नाराज असलेले संजय काकडे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आल्याच दिसत आहे.
पुण्याच्या राजकीय क्षेत्रात गणित मांडण्यात पंडित मानले जाणारे भाजप नेते संजय काकडे हे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेच्या भागात काढलेल्या प्रचार फेरीमध्ये संजय काकडे सक्रिय झाल्याचे दिसले. त्यामुळे संजय काकडे हे नाराज असल्याच्या चर्चांवर पडदा पडला आहे. काकडे प्रचार यंत्रणेत सक्रिय झाल्याने मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. “पुणे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला असून यावेळीही आम्ही पुणे लोकसभेची जागा सहजसहजी जिंकू असा” विश्वासही काकडे यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, “आपले जे काही मुद्दे होते ते पुणे शहर अध्यक्षांपासून राज्यातील आणि देशाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवले आहेत असे सांगतानाच मोहोळ यांच्या प्रचारात 30 एप्रिल नंतर सहभागी होणार असल्याचे सांगितले होते आणि त्याप्रमाणे सक्रिय सहभागी झालो असल्याचे संजय काकडे यांनी म्हटले आहे. गेल्या 10 वर्षांपासून पुणे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला झाला असून यावेळीही पुणे लोकसभेची जागा आम्ही सहजासहजी जिंकू” असा आत्मविश्वास असल्याचेही संजय काकडे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौक प्रकल्प पथदर्शी ठरणार – मोहोळ
-“राष्ट्र प्रथम विरुध्द परिवार प्रथम असं मानणार्यांमध्ये हा संघर्ष”- प्रकाश जावडेकर
-अजित पवारांची भोरमध्ये “सर्जिकल स्ट्राइक”; शरद पवार गटाला मोठा धक्का
-पुण्याला सभेसाठी जाताना शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
-Sholay | साऊथच्या ‘या’ चित्रपटाने दिली थेट ‘शोले’ला टक्कर; बॉक्स ऑफिसवर थलापथीचा धमाका