पुणे : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे लोकसभेतून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. काँग्रेसकडून इच्छुक असणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढले तरी त्यांचा पराभव करू शकतो, असे आव्हान दिले आहे. आता धंगेकर यांच्या वक्तव्याचा भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
धंगेकर हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ही निवडणूक लोकसभेची असून विधानसभेची नाही. कसब्यात ते अनेक वर्षांपासून काम करत होते म्हणून निवडून आले. लोकसभेच्या निवडणुकीत फरक आहे, लोकसभेसाठी सर्व ६ मतदारसंघात जाळे निर्माण करावे लागते. देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये येण्याची गरज नाही. माझ्यासारखे फडणवीस यांचे काही चेलेच धंगेकरांना खूप होतील, त्यामुळे त्यांनी मोठ्या नेत्याचे नाव घेऊन बोलू नये, असा टोला संजय काकडे यांनी धंगेकरांंना लगावला आहे.
“लोकसभेसाठी माझी देखील दावेदारी”
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही बरेच जण इच्छुक आहोत. मी देखील इच्छुक आहे आणखी ४ जण इच्छुक आहेत. आम्ही सर्व इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. इच्छुक जास्त असणं हे पक्षाच्या फायद्याचं असतं. कारण इच्छुक असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य जागृत राहते. पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी तो उमेदवार बहुमताने निवडून येईल. इच्छुक असणं काही चुकीचे नसतं, परंतु पक्ष आदेश देईल ज्या उमेदवाराला तिकीट देईल, त्या उमेदवारासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्ष एकजुटीने काम करेल असेही संजय काकडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs Racket: ड्रग्ज मालिका काही संपेना; कोंढव्यात सापडले २ किलो ड्रग्ज
-पुण्यातील मार्केट यार्ड आज शांत; कामगार संघटनांकडून बंदची हाक
-“कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसणे असा…”; अजित पवारांनी जनतेला लिहलं पत्र
-शिक्रापूरच्या शेतकऱ्यानं केली अफूची शेती; पोलिसांकडून १ हजार २२६ झाडे जप्त
-बारामतीत पोस्टर झळकले ‘सुनेत्रा पवार फिक्स खासदार’; अजित पवार गटाचा उमेदवार ठरला???