Mother’s Day : आज मदर्स डे. संपूर्ण देशात आज प्रत्येक जण आपापल्या परीने मातृदिन साजरा करताना दिसतात. काहींचे प्रेम फक्त सोशल मीडियावर व्यक्त करण्या इतकेच असते तर काही जण आईसोबत राहून वेळ घालवून साजरा करतात. सर्वसामान्यांप्रमाणेच सिनेकलाकारही मातृदिन साजरा करताना दिसतात. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आज मदर्स डे निमित्त आई नरगिस दत्तसाठी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
संजय दत्तने पोस्ट शेअर करताना आईचा गोड फोटोदेखील शेअर केला आहे. संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “प्रेम कसे करायचे हे ज्या व्यक्तीने मला शिकवले त्या माझ्या आयुष्यातील खास महिलेला मातृदिनाच्या शुभेच्छा. शांततेचे आयुष्य कसे जगायचे हे मी आईकडून शिकलो आहे. आईचे खूप खूप आभार…आईवर माझं खूप प्रेम आहे” अशी पोस्ट लिहत संजूने आपल्या आईचा एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटोदेखील शेअर केला आहे.
संजय दत्तच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. संजयच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक चाहते हि पोस्ट वाचून भावूक झाले आहेत. “सर तुम्हाला नेहमीच तुमच्या आई-वडिलांची आठवण येत असते”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
दरम्यान, अभिनेत्री नरगिस यांचे ३ मे १९८१ रोजी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. निधनाआधी त्या अमेरिकेत कर्करोगावर उपचार करुन भारतात आल्या होत्या. नरगिस यांची शेवटची इच्छा होती की, त्या आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावतील. पती आणि मुलगा दोघांच्या मधे बसून चित्रपट पाहण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. ६ मे १९८१ रोजी ‘रॉकी’ हा चित्रपट रिलीज होणार होता. ५ मे रोजी रात्री या चित्रपटाचा प्रीमियर होता. पण त्याआधीच नरगिस यांचे निधन झाले. संजय दत्तचा रॉकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना पाणी कपात; बारामतीला मात्र नियोजनापेक्षा जास्त पाणी
-मतदानाच्या दिवशी पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, तब्बल ५ हजार पोलीस असतील तैनात, वाचा…
-चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; शेवटच्या टप्प्यात महायुतीचाच बोलबाला
-‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही, पण संधी मिळाली तर ती सोडत नाही’- देवेंद्र फडणवीस
-Pune | पुणेकरांनो, दाखवा वोट केलेलं बोट अन् मिळवा सूट; स्विगीची भन्नाट ऑफर