पुणे : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारला चक्रावून ठेवलं आहे. मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. संगीता वानखेडे यांनी जरांगे यांची SIT चौकशीची मागणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांची नावं घेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
‘मी एसआयटी चौकशी करा हीच मागणी करत होते. अनेक राजकीय नेत्याचा जरांगे पाटील यांना सपोर्ट आहे. जरांगे पाटलाची चौकशी झाल्यावर सगळं दूध कमी पाणी का पाणी होईल. शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा. जरांगेचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे, गरज पडल्यास माझे देखील चौकशी करा’, असं संगीता वानखेडे म्हणाल्या.
मराठा समाजाची दिशाभूल जरांगे यांनी केली असन आरक्षणात फसवणूक केली आहे. जाणून बुजून माझी बदनामी केली जाते, सगेसोयरे मान्य होणार नाही आम्हाला तसं आरक्षण नको. येत्या निवडणुकीत जरांगे याला त्याची माणसे निवडून आणायची आहेत. गावागावातून पैसे गोळा होत आहेत. गाड्या कुठून आल्या याची चौकशी करा. आमच्या समाजाचं वाटोळं केलं असून आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होत असल्याचं वानखेडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात बनवल्या जात होत्या बनावट नोटा; पोलिसांनी ६ जणांना केलं जेरबंद
-यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुणे जिल्हयाला काय काय मिळालं? वाचा एका क्लिकवर
-वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय? सुप्रिया सुळेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण
-कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
-पुणे शहराला हवा “व्हिजनरी” खासदार, कोणाचे पारडे जड जनताच ठरवणार; हे मुद्दे एकदा वाचाचं