Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर तसेच मराठा आरक्षणासाठी दिलेल्या लढ्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. येत्या २१ जून २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिनेमाचे सर्व कलाकर जालना जिल्ह्यात पोहचले असून ठिकठिकाणी याचे प्रमोशन सुरु आहे.
जालना जिल्ह्यात मंठा या तालुक्यात चित्रपटाच्या टीमचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचा यश नव्हे, तर संघर्ष सर्वांसमोर आणायचा आहे. मनोज जरांगे पाटील फक्त लाठीचार्जमुळे मोठे झाले नाहीत, तर त्याआधी ही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते. हेच राज्याच्या जनतेसमोर आणायचे या उद्देशाने हा चित्रपट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
येत्या २१ जूनला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये सर्व समाजाने पहावा असे आवाहन या चित्रपटातील कलाकारांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनात्मक भूमिकेतून सरकारसोबत संघर्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष योद्धा’ चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा
-‘पोर्शे कार प्रकरण अन् आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ’; ४ जूननंतर सुषमा अंधारे करणार धक्कादायक खुलासे
-धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?