पुणे : राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. तर एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या केलेल्या वक्तव्याने सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये राज्यसभा खासदार शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही दिग्गज नेते उपस्थित होते. हे दोन्ही नेते मंचावर असताना देखील ज्ञानेश महाराव यांनी हे वक्तव्य केले आहे. यावरुन संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच भाजपचे नेते आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिली असून या संपूर्ण घटनेचा निषेध केला आहे.
शरद पवार, छत्रपती शाहू महाराज यांसारखे बडे नेते व्यासपीठावर उपस्थित असताना ज्ञानेश महाराव यांनी संपूर्ण हिंदू देवदेवतांचा अपमान केला आहे. त्यामुळे या घटनेला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा कुठेतरी राजकीय वास येताना दिसतो. अशी वक्तव्य करताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही, असे हेमंत रासने म्हणाले आहेत.
ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवदेवतांसह राज्यातील महिलांचा देखील अपमान केला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ऋषीपंचमीच्या दिवशी लाखो महिला भगिनी या अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी, संस्कृतीचा वासरा जपण्यासाठी एकत्र येत असतात. या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशा वक्तव्यांना पाठिंबा देणारे हिंदू धर्माला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हिंदू धर्म हा मतांच्या पलिकडे जाऊन अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत हेमंत रासने यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कट्टर राजकीय विरोधक येणार एका मंचावर; अजित पवार-सुरेश कलमाडी एकत्र येणार?
-‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?
-पुणेकरांना ‘वंदे भारत’ची पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार; नेमकं कारण काय?
-‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ
-जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती