पुणे : कोणत्याही वस्तूची एक्सपायरी झाल्यानंतर त्यांचा वापर करणे टाळायला हवे, मात्र काही विक्रेत्यांकडून मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकले जातात. पुण्यातील कात्रज परिसरामध्ये असणाऱ्या क्वालिटी बेकरीमधील आईस्क्रीम खाऊन एकाला विषबाधा झाल्याचा आरोप करत कात्रज परिसरात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यानी बेकरी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
कात्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या ‘क्वालिटी बेकरी’मधील आईस्कीम खाल्यानंतर एका तरुणाला आणि लहान मुलाला विषबाधा झाल्याचा दावा बेकरी फोडणाऱ्या धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी ८ ते १० कार्यकर्त्यांनी क्वालिटी बेकरीमध्ये जात मालकाला जाब विचारला तसेच बेकरीची तोडफोड केली आहे.
क्वालिटी बेकरीमधील आईसक्रीम खाल्याने झालेल्या त्रासाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना बेकरी मालकाने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ग्राहकांनी पुणे महापालिकेच्या अन्न प्रशासन विभागाकडे तक्रारही केली आहे. या प्रकरणी पालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्यास आम्ही महापालिका प्रशासनावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धर्मरक्षक दलाने दिला आहे.
दरम्यान, या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. संबंधित बेकरी चालकावर कार्यवाही करण्याची मागणी धर्म रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज
-पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका
-पैसे परत केले नाही म्हणून शिवीगाळ, मानसिक त्रास; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
-तुमच्याही नळाला पाणी येत नाहीये???; आता घरबसल्या करता येणार तक्रार