पुणे : पुणेकरांना गेल्या २ महिन्यांपासून पाण्यासाठी रात्री-अपरात्री जागे रहावे लागत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी भरता भरता उजाडते. तरीही मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. वापरण्यासाठी टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांचे वाद होत आहेत. त्यातच नवे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुणेकरांचा पारा चढला आहे.
“दिवसाला एका व्यक्तीला १५० लिटर पाणी वापरण्यासाठी मिळावे असे गृहीत धरण्यात आले आहे. मात्र पुण्यात प्रतिव्यक्ती दिवसाला २७० लिटर पाणी वापरले जाते. त्याच्या आधारे पुणेकर हे जास्त पाणी वापरतात”, असे वक्तव्य आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी केले आहे. या वक्तव्यावरून पुणेकर संतापले आहेत.
‘आयुक्त नवे असल्याने त्यांना वास्तवाची जाणीव नसावी. त्यांच्या बंगल्यावर मुबलक पाणी येते, त्यामुळे ते कधी पाण्यासाठी रात्री जागे राहिले नाहीत’, अशा शब्दात हडपसरच्या नेहा मुळे यांनी पुणेकरांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाण्याचा वाढीव कोटा मागणार का? असा प्रश्न विचारला असता आयुक्त भोसले म्हणाले की, सध्या पुणेकर निकषापेक्षा जास्त पाणी वापरतात. तसेच धरणातील पाण्यावर केवळ पुणेकरांचा हक्क नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते. आयुक्तांच्या वक्तव्याने पुण्याला मुबलक पाणी मिळणे आता कठिण होण्याची चिन्हं आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…
-चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून