पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. अशातच रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची ‘देवगिरी’वर जाऊन भेट घेतली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील या शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. तसेच त्यांना खुली ऑफर देखील दिली होती. त्यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि ‘अजितदादा, मी तुमच्यासोबत राहणार आहे’, असे देखील अजित पवारांना सांगितले असल्याची माहिती आहे.
रुपाली पाटील यांना अजित पवारांनी ‘ज्या चर्चा ऐकल्या त्या खऱ्या आहेत का?’, असा प्रश्न अजित पवारांनी रुपाली पाटील यांना विचारला त्यावर त्यांनी दादा मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द अजित पवारांना दिला आहे. तसेच आज सकाळी ठोंबरे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत राहण्याचा शब्द दिल्यामुळे आता रुपाली पाटील या पक्षात नाराज असून ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रोहित पवारांच्या ट्विटची महाराष्ट्र पोलीस विभागाने घेतली दखल; पोलीस भरतीबाबत ‘हा’ मोठा निर्णय
-मिलियन्समध्ये फॉलोवर्स असणारी X-mau मयुरी पवार गायब; पोलिसांकडून शोध सुरू
-लोकसभा पराभवानंतर RSS इन ॲक्शन मोड; ‘मोतीबागेत’ नेत्यांची परेड; नेमकं घडतंय काय?
-अजित पवार गटाचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक; मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?