पुणे : पुणे पोर्शे कार अपघातावरुन राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यातच या प्रकरणाला राजकीय स्वरुप मिळाले आहे. या प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा जास्त उचलून धरत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना धंगेकरांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.
“फडवणीस साहेबांनी अजितदादांचे हातपाय बांधले, असे रवी भाऊ धंगेकर तुम्ही बोलून गेलात. पण तुम्हाला आठवण करून दयायची आहे, हे तेच अजितदादा आहेत, ज्यांनी महविकास आघाडीत असताना तुमच्या आमदारकीचे हातपाय झटकून, तन, मन, धनाने जोरात काम केले, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितले. आता दादा महायुतीत आहे हा तुमचा त्रास आहे”, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
“महायुतीचे सरकार असल्याने अजितदादा-फडवणीससाहेब यांच्यातील समन्वय, संवाद एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय. याच्या जास्त वेदना होत आहेत, याची जाणीव आम्हाला आहे. गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले म्हणजे पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच एकत्रित निर्णय केलेला असतो तो. भाऊ तुम्हाला समजत नसेल किंवा समजून सुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून घडलेली घटना, गुन्हा, केस न समजता विरोधक म्हणूनच टीका करत आहात”, असेही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा
-पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा