पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी ७ आमदारांचा शपथविधी पार पडला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची चांगलीच चर्चा होती. मात्र, पक्षातीलच अनेकांचा या निर्णयाला विरोध होता. त्यामुळे राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये रुपाली चाकणकरांचं नाव नव्हतं.
रुपाली चाणकरांच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी पक्षातील नेत्यांकडून विरोध झाला. मात्र, चाकणकरांना आमदारकी नाही पण महिला आयोगाचं अध्यक्षपद पुन्हा एकदा मिळालं आहे. चाकरणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे.
‘एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का? पक्षात इतर महिला नाहीत का?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला होता. येत्या २२ तारखेला चाकणकरांच्या अध्यक्षपदाचा कार्यकारळ संपणार होता. पण त्याआधीच त्यांच्याकडे त्याच पदाची धुरा देण्यात आली आहे. यावर आता रुपाली ठोंबरे पाटील काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Chinchwad: जगताप कुटुंबाला स्वकियांकडूनच विरोध; विरोधी उमेदवार होणार फायदा?
-‘महाविकास आघाडीची २१८ जागांवर एकवाक्यता’ पण हडपसरचं काय? अमोल कोल्हे म्हणाले…
-Assembly Election: विधानसभा बिगुल वाजलं; महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदान कधी?
-दीपक मानकरांना डावललं अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडली वादाची ठिणगी