पुणे : पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार गटातील नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर बोलत होत्या.
“खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. मात्र त्या संसदरत्न पुरस्कारातच रमल्या आहेत. त्यांनी जर सर्वसामान्य लोकांची कामे गेल्या १५ वर्षात केली असती तर त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब उतरवण्याची वेळ आली नसती, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. ‘घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा’, असाही टोला चाकणकर यांनी सुळे यांना लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात त्यांची कन्या रेवती सुळे, त्यांचे भाचे युगेंद्र पवार हे युवा नेते रस्त्यावर उतरुन प्रचार करत आहेत. यावरुन रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना सणसणीत टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…अन् ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे पडले अजितदादांच्या पाया; सर्वत्र होतेय चर्चा
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार
-‘मी निवडणुकीत जिंकण्यासाठी उतरतो, लाखाच्या फरकानं सुनेत्रा पवार विजयी होणारच’- अजित पवार
-पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी; मोदींच्या विशेष पथकाकडून सभास्थळाची पाहणी
-पुणे तिथे काय उणे! नोकरीला लाथ मारत, बॉसला दिली खुन्नस; ढोला-ताशा वाजवत जल्लोषात कंपनीतून एक्झिट