पुणे : पुणे शहरात ड्रग्ज प्रकरण काही थंड होत नाही. या प्रकरणाचे जसे धागेदोरे सापडत आहेत तसे पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे आणि नवी माहिती समोर येत आहे. विविध भागात ड्रग्ज साठा जप्त केला जात आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत एकट्या पुणे शहरातून तब्बल ७०० किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यावरुन आता राजकारणही चांगलेच तापले आहे.
विरोधी पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ड्रग्ज प्रकरणी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
“एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलं. एकतर आपले गृहमंत्री 100 टक्के जबाबदार आहेत. तुमच्या काळात पकडलं पण उत्पादन सुरू कधी झालं किती विकल गेलं ते सांगा. इथलं सगळं गुजरातला आणि ड्रग्स फॅक्टरी इथं… राज्यात बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षा जास्त गुन्हेगारी वाढली आहे”, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
“पालकमंत्री साहेबांनी पुण्याच्या गुन्हेगारीत लक्ष घालावं. अजित पवारसाहेबांसोबत काम करत असताना गुंड दादांच्या शंभर मीटर पेक्षा लांब राहायचे. ते आता फोटो काढतात. आता पुण्यात गुंड दिसतात. नेत्यांची मुलं गुंडांना भेटायला येतात. लोकसभा आणि विधानभा निवडणुकीत गुंडचा वापर करू अस हे लोक सांगत आहेत”, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक
-राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा
-नसांच्या दुर्लक्षित स्थितीच्या उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीने सुरु केले ‘स्पेशलाईझ्ड क्लिनिक’
-‘पुण्यात फडणवीस किंवा कोणी वरिष्ठ नेता ही निवडणूक लढो, जिंकणार मीच’- रविंद्र धंगेकर
-पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे ‘कोडवर्ड’ आले समोर; ‘लंबा बाल’, ‘मुंबई बंदर’ आणि ‘न्यू जॉब पुणे’