पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चांगलाच दणका दिला आहे. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो बाबत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे. रोहित पवारांवर केलेल्या या करावाईने रोहित पवारांसह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.
त्यावर आता रोहित पवारांनी एक जबरदस्त ट्विट केलं आहे. “माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?”, असं खोचक ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.
“पण भाजपने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय”, रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
“आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांचा थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवार, बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. शिखर घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कारखान्यातील १६१.३० एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक
-‘सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेली’; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान जुंपली
-ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त
-पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर