पुणे : विधानसभा निवडणूक पार पडली आणि राज्यात पुन्हा एकदा महयुतीची सत्ता आली. अशातच एकीकडे मंत्रिमंडळात कोणाला कोण असणार? कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं तसेच मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच दुसरीकडे अद्यापही अनेकांना पराभव पचनी पडला नसल्याचे दिसत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. तसेच या निवडणुकीत “माझ्याविरोधात कट शिजला. रोहित पवार यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे मदत केली”, असा गंभीर आरोपही राम शिंदे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणावरुन आता रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“२०१९च्या पराभवाचं खापर राम शिंदेंनी राधाकृष्ण विखे पाटलांवर फोडलं होतं. आता अजितदादा नवीन बळीचा बकरा दिसत आहेत. यांच्यावर खापर फोडून कसं तरी मंंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे. असा केविलवाणा प्रयत्न शिंदेंचा आहे. ३० ते ४० कोटी खर्च केला असं आम्हाला कळतं. गुंड, सरकारी यंत्रणा, दडपशाही वापरूनही ते हरले. हे पराभवाच्या नैराश्य त्यांच्या मुखातून बोलत आहे”, असेही रोहित पवार म्हणाले आहे.
“राम शिंदे यांना जर वाटतं अजित पवारांनी महायुतीचे काम केलं नाही, तर मग त्यांनी तत्काळ देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करा. किंबहुना त्यांना राजकारणातील जास्त कळत असेल तर देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करा आणि राम शिंदे यांना मुख्यमंत्री करा”, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप
-निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात
-भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?
-पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? या ४ आमदारांची नावे चर्चेत