पुणे : भारतरत्न पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावर १५३ (अ), ५०० व ५०५ या कलामांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
“पुणे शहरात अनेक विचारवंत होऊन गेले. लोकशाही टिकवण्यासाठी काही विचारवंत कार्यक्रम घेत आहेत. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केलं. लोकशाहीच्या विरोधात आंदोलन करणं हे अपेक्षित होतं. देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही आवडत नाही. जिथं तिथं भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. लोकशाही टिकली पाहिजे. आहे तिथून आम्ही सर्व कार्यक्रमाला आलेलो आहोत”, असं म्हणत रोहित पवार यांनी निखील वागळेंवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी भाजपला धारेवर धरलं आहे.
अजित पवार गटाबाबत रोहित पवार काय म्हणाले?
अजित पवार गटाकडे दुसरा पर्याय नाही त्यांना भाजपची स्क्रिप्ट वाचावी लागत आहे. भाजप जे सांगेल ते त्यांना करावा लागत असल्याने कदाचित त्यांना या ठिकाणी यावं लागलं. कशाच्या विरोधात आपण आंदोलन करतोय हे सुद्धा त्यांना माहिती नाही. चव्हाण साहेबांचं नाव फक्त घेण्यासाठीच तेच घेत असावेत.
“निखिल वागळे यांनी आमचाही विरोध केलेला आहे. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी मुभा असावी. पत्रकार आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्याला विरोध करायचा. हे योग्य नाही”, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
“पोलिसांना आम्ही सांगू गृहमंत्र्यांचा तुम्ही एवढा ऐकू नका त्यांना कार्यक्रमाला सोडून द्या. लोकशाही टिकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी ही मदत केली पाहिजे”.
महत्वाच्या बातम्या-
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा
-“पक्ष, चिन्ह, झेंडा आमच्याकडेच आता नेत्यांनी ठरवावं…”; अजितदादांचं इतर नेत्यांना आवतान
-“भुजबळांच्या पेकाटात लाथा घालू म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का काहीच बोलत नाहीत?”