पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमधील नेत्यांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राजकीय भविष्याबाबत भाष्य केले आहे.
‘येणाऱ्या काळात अजित पवार कदाचीत एकटेच पडतील. त्यांच्यासोबत असणारे जे नेते आहेत, ते त्यांच्यासोबत राहतील काही नाही? हा प्रश्न आहे. अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंची देखील स्थिती होईल. भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं’, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
‘२०२४ मध्ये हे पक्ष राहतील का? हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय. काही आमदारांना धमकी घेऊन गेले आहेत, येणाऱ्या काळात हे आमदार आमच्यासोबत येतील. आपण आपल्या आई वडिलांना कधी विसरत नाही, आपल्या गुरूला कधी विसरत नाही. आपल्या काकांना कधी विसरत नाही. पण आज काल लोक ते विसरतात. पण जाऊद्या ज्यांना विसरायचं त्यांना विसरु द्या. आपण संघर्ष करूयात, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे.
“ते कशावरही आक्षेप घ्यायला लागले आहेत.आता हे लोक भाजपची भाषा बोलायला लागले आहेत, लोकशाही राहिली बाजूला आणि आता हे म्हणत आहेत की राष्ट्रवादी शरद पवार गटाला काहीच मिळालं नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण आम्ही लढू आणि लवकर आम्हाला चिन्ह देखील मिळेल आम्ही निवडणूक आयोगाकडे एकच चिन्ह देणार आहोत आणि ते आम्हाला मिळेलच कारण ते चिन्ह याआधी कोणत्याही पक्षाने वापरलेले नाही”, असे म्हणत रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी महापालिकेच्या बजेटमध्ये या ३ आमदारांना झुकतं माप; चिंचवडच्या पदरी भरीव निधी
-अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?
-शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कामगिरी; चोरी करुन कोयते बाळगणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
-भाजपचा ‘तो’ प्लॅन सक्सेस! मेधा कुलकर्णींसह राज्यसभेवर चव्हाण, गोपछडेंची बिनविरोध निवड
-पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ४० हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त