पुणे : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करताना पहायला मिळत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळाचा पाढा वाचला असून त्यांना धारेवर धरलं आहे. रोहित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहित पवारांनी भाजप आणि तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. तसेच रोहित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत चक्क जिवंत खेकडा दाखवला आणि ‘हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचा प्रतीक’ असं म्हणत तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“आरोग्य विभागात साडे ६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. याला आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे. ही फाईल पुढे पास कशी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते. त्यांनी दुर्लक्ष केलं का? साडे ६ हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे”, असं म्हणत रोहित पवारांनी तानाजी सावंत आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2024
“५३९ कोटी रुपये अॅम्ब्यूलन्सच्या खरेदीच्या नावाखाली खात्याल आले. सुमीत फॅसिलिटी ही पिंपरी चिंचवडची कंपनी होती. या कंपनीला अॅम्ब्यूलन्स चालविण्याचा अनुभव नव्हता. मात्र तरीही मुख्यमंत्री दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत या सुमेत कंपनीचा करार करण्यात आला. मात्र त्यानंतर बी. व्ही.जी. या कंपनीने हे कंत्राट त्यांना मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यानंतर बी. व्ही.जी.चा देखील समावेश या कंत्राटात करण्यात आला. मी या मुद्द्यावर मी आरोग्य मंत्र्यांशी जाहीर चर्चा करायला तयार आहे. या भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरण्यात येणार आहे. म्हणून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना खूशखबर! आजपासून आंबा महोत्सव सुरु; थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा हापूस
-Shirur Lok Sabha | ‘वाचाळवीरासारखं बरळणं बरं नाही’; आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना धरलं धारेवर