पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते.यावेळी रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.
‘अजित पवार भाजपसोबत गेल्याने त्यांची व्होट बँक कमी झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आमदार अमोल कोल्हे यांना पाडणार म्हटले, पण तेच लोकसभेला ४ जागा लढणार, अशी चर्चा आहे. त्यांच्यात प्रफुल पटेल हेच हुशार आहेत, असं वाटतं. त्यांनी ४ वर्षे बाकी असतानाही राज्यसभेवर पाठवण्यात आले. बाकी ९ जणांना काहीच मिळाले नाही’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
‘निवडणुकीपूर्वी अजून १० ते १५ मोठे नेते त्यांच्यावर असलेल्या दबावामुळे भाजपमध्ये सामील होतील. सध्या गृहखाते फेल झाले आहे. लोकांची घरं फोडण्यात आणि राजकारण करण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अडकले आहेत. त्यामुळे त्यांना खात्यांवर लक्ष देण्यात वेळ नाही’, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
‘अनिल तटकरे आणि सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही ते आमच्या संपर्कात होते. आजही आहे पण त्यांना अजून कोणतेही पद दिले नाही. त्यांना कोणते पद द्यायचे ते जयंत पाटील ठरवतील’, असंही रोहित पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त
-पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन!; पुणे पोलिसांकडून कसून चौकशी
-लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये ३ नावांची चर्चा; धंगेकरांना उमेदवारी देण्याची समर्थंकांची इच्छा
-अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांसोबत; रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही…’
-मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिल्यानंतर भाजपचा आणखीन एक सर्व्हे; कोणाचं नावं आघाडीवर?