पुणे : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच अधिवेशानाचा कालचा दिवस हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे गाजला. जरांगेंच्या आंदोलनाची आणि त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याकरता एसआयटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले. तर, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे. आमदार रोहित पवार यांनी आपले काका अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
“मला वाईट याचं वाटतं की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच गुंडांना भेटत असावेत. आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं आहे. ही तुमची वृत्ती आहे. भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही गुंडांचा वापर करणार? असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला.
“गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना गुंड भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात. अजितदादांना गुंड भेटतात. मग लोकसभेला गुंडाचा वापर करणार आहात का?” असा थेट सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.
एसआयटीचा मुद्दा कोणी मांडला? भाजपच्या आमदाराने मांडला. एसआयटी कोणी गठीत केली? तर एसआयटी भाजपच्या अध्यक्षांनी गठीत केली. अशा परिस्थिती टार्गेट कोणाला प्रयत्न केला जातोय? त्यामुळे भाजपचे टार्गेट एकनाथ शिंदे नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“मी राजकारणात असतो तर…”; व्हायरल पत्रानंतर राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, करोडोंची प्रॉपर्टी केली सील; मोठं कारण आलं पुढे
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; १० ते १२ गाड्यांची तोडफोड
-सासवडमध्ये कांद्याच्या शेतात अफूची लागवड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
-“जबाबदारीच्या पदावर बसलेली लोक पोरकट बोलतात”; शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं