पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाल्यानंतर गेल्या २ महिन्यात संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. अशातच आता काल (सोमवारी) संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायर होत आहेत. यावरुन आज मंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सूपूर्त केला त्यांनी तो स्विकारला आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनाम्यानंतर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी आजारपणाचे कारण देत राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत पत्रक जारी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये धनंजय मुंडेंचा देशमुख प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख पत्रकामध्ये करण्यात आला आहे.
श्री. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेल्या राजीनामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी जारी केलेले पत्रक @SunilTatkare pic.twitter.com/ZxgvO2qnLe
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 4, 2025
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणातून पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे, न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही या पत्रकामध्ये म्हटले आहे.
धनंजय मुंडेंचं ट्वीट
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
“या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं महागात; गुंड गजा मारणेची तरुंगात रवानगी
-रणवीर अलहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ‘पॉडकास्ट सुरू करता येणार, पण…’
-स्वारगेट अत्याचार: तपासात दररोज नवे खुलासे; पुणे पोलिसांचा घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी, मार्चचा हफ्ता कधी जमा होणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची महिती
-लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा अन् मग… पोलिसांनी नराधम दत्ता गाडेची कुंडली काढली