पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढण्यात आल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज राज्यभरातील प्रतिनिधींची बैठक पुण्यामध्ये बोलवली होती. जवळपास २७ जिल्ह्यांमधील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकनंतर बोलताना तुपकर यांनी “मला संघटनेतून बाहेर काढले असले तरी शेतकऱ्यांच्या मनातून कसे बाहेर काढणार?” असा प्रश्न करत माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर घणाघात केला आहे.
‘मी घरदार सोडून संघटना वाढवण्यासाठी काम केलं, आज त्यांच्यामुळे मला नाव मिळालं हे म्हणतात, मात्र कोल्हापूरच्या तीन तालुक्यात असणारी संघटना आम्ही राज्यभरात नेहली. आमचे तारुण्य समर्पित करून आम्ही योगदान दिले आहे. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली बैठक त्यांना माहिती नसल्याचं म्हणतात. मात्र, ही संघटनेची नाही तर शेतकरी चळवळ पुढे कशी जाईल, यावर विचारमंथन करण्यासाठी होती. परंतु या बैठकीला लोक येऊ नयेत, म्हणून घाई गडबडीने मला संघटनेतून बाहेर काढण्याचा निर्णय केला’, असं रविकांत तुपकर म्हणाले.
प्रत्येक वेळी मला संधी असताना यांनी राजकीय तडजोडी करण्यासाठी माझा बळी दिला. मी ठरवलं असते तर कोणत्याही पक्षात जाऊन आमदारकी मिळवली असती. २००२ साली शरद जोशी यांनी शेट्टींना जिल्हा परिषद सदस्य केलं. मात्र शिरवळच्या जागेसाठी सवतासुभा निर्माण केला. तुम्ही बारामतीला आमरस खाऊन काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तुम्ही राजकारणासाठी भूमिका बदलता मग एखाद्या कार्यकर्त्यांची राजकीय इच्छा असेल तर कसे रोखता, असा खडा सवाल यावेळी तुपकर यांनी राजू शेट्टींना केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेच्या पराभवानंतर आढळराव पाटलांना राज्य सरकारचा मोठा दिलासा; सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
-फडणवीसांच्या भेटीआधी अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शहांसोबत रात्री १ वाजता खलबतं
-लाडकी बहिण योजनेत १७ विघ्न; राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ‘हे’ महत्वाचे ६ बदल
-पुण्यात २४ तास पावसाची संततधार; राज्यातील ‘या’ जिल्हांना सतर्कतेचा इशारा